प्रज्ञा राजेंद्र चौधरी यांच्या तर्फे आपले या ब्लॉग वर सहर्ष स्वागत आहे ..... सुस्वागतम

UPSC काय ?

                                                                          UPSC काय ?

                                                     (उतावळ्या Aspirant, गुडघ्याला बाशिंग)


       यूपीएससी का करायची ,हे एकदा ठरल्यानंतर आता आपण या परीक्षेचे नेमके स्वरूप माहिती करून घेणे आवश्यक आहे. कुठलीही गोष्ट करताना अथवा परीक्षा देताना आपल्याला तिची व्यवस्थित ओळख असली पाहिजेल. त्यामुळे आपण आत्ता  यूपीएससी ला जाणून घेऊयात. कदाचित तुमच्यापैकी बऱ्याच जणांना UPSC चे Basics माहीत असतील ,काहींनी तर दोन-तीन वर्ष तयारीदेखील केली असेल. पण तरीही मी असं गृहीत धरते की तुमच्यापैकी प्रत्येक जणाची zero पासून सुरुवात आहे . त्यामुळे मी Basics पासूनच तुम्हाला सांगणार आहे ,म्हणजे अगदी पेन कोणता निवडायचा ते Interview पर्यंत.

           UPSC म्हणजेच Union Public Service commission अर्थात केंद्रीय लोकसेवा आयोग. या आयोगाच्या माध्यमातून घेतल्या जाणाऱ्या परीक्षेद्वारे केंद्रीय सेवांमधील अधिकारी निवडले जातात. उदा -  IAS, IPS, IRS , etc. अशी जवळ जवळ 27-28 वेगवेगळी पदे दरवर्षी भरली जातात. त्यासाठी UPSC दरवर्षी परीक्षा घेत असते. ही परीक्षा पूर्व ,मुख्य आणि मुलाखत अशा तीन टप्प्यांमध्ये होते. 

            पहिला टप्पा Prelims म्हणजे पूर्व परीक्षेचा असतो. याआधी  पूर्व परीक्षा साधारणपणे ऑगस्टमध्ये व्हायची, आता ती जून पासून सुरू होणार आहे. MCQ पद्धतीचे म्हणजेच बहुपर्यायी प्रश्न पूर्वपरीक्षेत विचारले जातात. म्हणजे तुम्हाला एक प्रश्न विचारलेला असतो आणि त्या प्रश्नाखाली चार पर्याय असतात. त्यापैकी योग्य पर्यायाची निवड तुम्हाला करायची असते. असे दोन पेपर असतात  पहिला पेपर GS-1  म्हणजे 'सामान्य अध्ययन-1'  तर दुसरा पेपर 'सामान्य अध्ययन 2' CSAT म्हणजे civil services aptitude test अर्थात नागरी सेवा कल चाचणीचा असतो. याला नकारात्मक गुणपद्धती (Negative marking ) असते. म्हणजेच जर तुम्ही तीन प्रश्नांची उत्तरे चुकीची दिली तर तुमच्या एका अचुक उत्तराचे मार्क्स वजा होतात. शिवाय पूर्व परीक्षा ही मराठीमध्ये नसते. प्रश्नपत्रिका इंग्रजी व हिंदी मध्ये असते. एकीकडे इंग्लिशमध्ये छापलेलं असत. तर दुसर्‍या बाजूला त्याच हिंदी भाषांतर छापलेल असत.  तुम्हाला या दोन्ही भाषांपैकी  जे जमतं ते तुम्ही सोडवणं गरजेचं आहे. GS-1 या पेपरमध्ये history ,geography ,pol.science, environment ,economics ,current affairs, science and Technology असे Topics असतात. या पेपर मध्ये 100 प्रश्न आणि 200 मार्क्स आहेत .शिवाजी GS-1 चे  मार्क्स हे तुमच्या  merit मध्ये  count होतात. म्हणजे यात तुम्हाला जेवढे मार्क्स पडतील   त्या मार्क्सवरती तुमचं भविष्य (Mains चं) ठरत असतं. दुसरं म्हणजे CSAT च्या पेपरमध्ये साधारणपणे English comprehension passage, Mathematics (Time, Speed , Work , permutation & combinations, percentages , averages, clock) आणी Logical reasoning यामध्ये Syllogism, Seating arrangement, Blood relations ई . गोष्टी असतात. यामध्ये 80 प्रश्न असतात, एका प्रश्नाला 2 हाफ मार्क्स असतात. एकूण 200 मार्क्स चा पेपर असतो. मात्र हा qualifying पेपर आहे. याचा अर्थ असा आहे की, तुम्हाला जर पूर्व परीक्षा पास करायची असेल तर दुसऱ्या पेपर मध्ये तुम्हाला 200 पैकी 200 मिळून उपयोग नाही , त्यांनी qualifying चा अर्थ असा दिला आहे की, तुम्हाला त्या पेपर मध्ये फक्त 33% मार्क्स पाडायचे आहेत. म्हणजेच 200 पैकी 66 मार्क्स पडणे गरजेचे आहे. पास होण्यासाठी दोन्ही पेपरचे मार्क्स  ग्राह्य न धरता पहिल्या पेपरमध्ये जो score आहे त्याच्यावर च तुमचं  मेरीट ठरणार आहे. तुम्ही 200 पैकी 200 मिळवले आणि 200 पैकी 66 मिळवले तरी तुमचे status same राहणार आहे. म्हणजे यामध्ये जास्त मार्क्स पाडून फायदा नाहीये. ( म्हणजे पाडले पाहिजेत) पण पाडून काही फायदा होणार नाही.यामध्ये 80 प्रश्न असतात, एका प्रश्नाला 2 हाफ मार्क्स असतात. एकूण 200 मार्क्स चा पेपर असतो. मात्र हा qualifying पेपर आहे. याचा अर्थ असा आहे की, तुम्हाला जर पूर्व परीक्षा पास करायची असेल तर दुसऱ्या पेपर मध्ये तुम्हाला 200 पैकी 200 मिळून उपयोग नाही , त्यांनी qualifying चा अर्थ असा दिला आहे की, तुम्हाला त्या पेपर मध्ये फक्त 33% मार्क्स पाडायचे आहेत. म्हणजेच 200 पैकी 66 मार्क्स पडणे गरजेचे आहे. पास होण्यासाठी दोन्ही पेपरचे मार्क्स  ग्राह्य न धरता पहिल्या पेपरमध्ये जो score आहे त्याच्यावर च तुमचं  मेरीट ठरणार आहे. तुम्ही 200 पैकी 200 मिळवले आणि 200 पैकी 66 मिळवले तरी तुमचे status same राहणार आहे. म्हणजे यामध्ये जास्त मार्क्स पाडून फायदा नाहीये. ( म्हणजे पाडले पाहिजेत) पण पाडून काही फायदा होणार नाही. 

          Mains  म्हणजे  मुख्य परीक्षेमध्ये एकूण 9  पेपर्स असतात. सर्व 9 पेपर्स descriptive म्हणजे वर्णनात्मक आहेत. त्यामुळे मुख्य परीक्षेला 'लिखाणाची परीक्षा' म्हटले जातात.यामध्ये तुम्हाला विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर 100-200 शब्दात लिहिणे अपेक्षित असतं. ( जी कोणती भाषा निवडाल त्यामध्ये ) इथे निगेटिव्ह मार्किंग नाही. प्रश्नपत्रिका फक्त हिंदी व इंग्रजी मध्ये छापलेली असते. मात्र मराठी माध्यम निवडलं असल्यास मराठीतून उत्तरे लिहिता येतात. प्रश्न हिंदी अथवा इंग्रजीमध्ये वाचून तो समजून घेऊन आपण निवडलेल्या भाषेतून उत्तरे  लिहावे लागत.परीक्षेच्या माध्यमासाठी एकूण 22 Schedule languages आहेत. (8th Schedule of constitution).त्यापैकी मराठी एक आहे. त्यामुळे आपण मराठीत मुख्य परीक्षा देऊ शकतो.

      ( भाषा वगळता) मुख्य परीक्षेतील सर्वच्या सर्व पेपर्स 250 मार्क्सचे आहेत. 250 ×7 = 1750 मार्क्सची ही परीक्षा आहे. याशिवाय 1)Compulsory english 2) Schedule language हे दोन पेपर्स प्रत्येकी 300 मार्क्स चे असतात. हे दोन पेपर्स qualifying आहेत. याचा अर्थ असा होतो की या पेपर्समध्ये  score कितीही केला तरी फायदा नाही .(CSAT प्रमाणे) या पेपर्समध्ये तुम्हाला 25% score करायचा असतो. यामध्ये essay 1/3rd करा.( एक तृतीयांश सारांश) , भाषांतर करा या प्रकारचे प्रश्न असतात. याचं महत्त्व एवढ्यासाठीच  आहे की तुम्ही जर 300 पैकी 25% (75) गुण मिळवायला अपयशी ठरला तर उरलेले जे 250 मार्क्स चे 7 पेपर्स ( total 1750) आहेत, ते पेपर्स तपासलेच जाणार नाहीत. सर्वात आधी दोन पेपर्स चेक होतात, या पेपर्समध्ये तुम्ही qualify झालात (25%) तरच तुमचे पुढे पेपर्स तपासले जातात आणि तुम्ही तिथूनच मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरतात. त्यामुळे हे पेपर्स फारसे अवघड नसले तरी त्यांना गांभीर्याने घेणे आवश्यक आहे.

          यानंतर essay  चा एक पेपर असतो. त्यामध्ये तुम्हाला साधरण 8 विषयांपैकी दोन विषयांवर essay लिहावे लागतात. प्रत्येकी 125 -125  मार्क्सचे ते असतात. त्यानंतर GS -1,2,3,4 असे GS चे चार पेपर्स आहेत. त्यानंतर तुम्हाला एक वैकल्पिक विषय ( optional) घ्यावा लागतो. त्याचे दोन पेपर्स असतात paper 1 & 2 , दोन्ही प्रत्येकी 250-250 मार्क्सचे असतात. त्यामुळे GS -1 ,2,3,4 मिळून 1000 मार्क्स + optional चे 500 मार्क्स + essay चे 250 मार्क्स अशी 1750 मार्क्स ची ची मुख्य परीक्षा होत असते. (Except Qualifying languages.) 

         मुख्य परीक्षेचा टप्पा सगळ्यात महत्त्वाचा असतो. कारण इथे तुमचा जो काही score असतो, तो तुमच्या merit मध्ये count होतो. म्हणजेच final merit मध्ये तुमचे prelims चे  मार्क्स गृहीत धरत नाहीत. फक्त मुख्य परीक्षा व मुलाखतीच्या मार्क्स वरून तुमची merit and ranking ठरत असते. म्हणून मुख्य परीक्षेचा टप्पा खूप महत्त्वाचा आहे.

      थोडक्यात मुख्य परीक्षेचे 1750 गुण आणि मुलाखतीचे 275 अशा एकूण 2025 गुणांवर तुमचं final merit and ranking ठरत असतं. इथे एक- एक मार्क महत्वाचा असतो.

No comments:

Post a Comment