प्रज्ञा राजेंद्र चौधरी यांच्या तर्फे आपले या ब्लॉग वर सहर्ष स्वागत आहे ..... सुस्वागतम

ट्रेनिंग

                                                                                 ट्रेनिंग


ट्रेनिंग मध्ये काय असतं? अशा स्वरूपाचे प्रश्न व जिज्ञासा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये असते.अर्थात ,येथे सर्वच गोष्टींचा तपशील देऊन मी तुमची उत्सुकता कमी करणार नाही. येथे फक्त काही ठळक  गोष्टींबद्दल माहिती देत आहे.बाकी गोष्टी तुमच्यासाठी सरप्राईज असतील , ज्याचा तुम्हीच अनुभव घ्या.

निकाल लागल्यानंतर सामान्यपणे तीन महिन्यांनी Foundation Course (FC) सुरू होतो. त्यासाठी UPSC ने  निवडलेल्या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांनी ऑनलाइन फॉर्म भरावयाचा असतो. ज्यांना पसंतीची rank किंवा service ( IAS ई .) झाली नाही व ज्यांना पुन्हा attempt द्यायचे आहे, त्यांना पंधरा आठवड्याच्या या फाउंडेशन कोर्स मधून सूट मिळते.

   * FC हा प्रमुख्याने Lal Bahadur Shastri National Academy of Administration (LBSNAA), मसूरी( उत्तराखंड) मध्ये घेतला जातो.FC नंतर IAS झालेले Officer Trainees तिथेच थांबतात व उर्वरित OT's आपापल्या Training Academy त जातात.( जसे IPS Hyderabad)

* FC मध्ये प्रामुख्याने 6 विषय शिकवले जातात.

      (1) Management

      (2) Law

      (3) Public  Administration

      (4) Economics

      (5) Political Science

      (6)History and Culture.

याशिवाय प्रत्येक OT ला कोणतीही एक भारतीय भाषा शिकावी लागते या भाषेचे आठवड्यातून एक लेक्चर होतं. तसेच प्रत्येकाला एक Extra Curricular Module  निवडावा लागतो. यामध्ये Horse riding, Painting, Cooking, Photography, Calligraphy, Public speaking, Guitar Piano, Unarmed Combat  ई.चा समावेश होतो.यांचंही आठवड्यातून एक लेक्चर होतं.

 FC मधील दिनक्रम सामान्यपणे पुढील प्रमाणे असतो.( टीप: यात बदल होऊ शकतो)

     6-7                  :   P.T

     8-9                   :  Breakfast

     9-10                 :  lecture 1

    10-11                 :  lecture 2   

    11-1130             :   Tea break

    11:30- 12:30      :  lecture 3

    12:30- 1:30        :   lecture 4 

   1:30- 2:30           :  Lunch Break 

   2:30 -3:30           :  lecture 5

  3:30-4:30             :   lecture 6             

4:30 सुट्टी. तथापि,  साधारणपणे 15 दिवसातून एकदा सायंकाळी Cultural Nights चे आयोजन केले जाते. त्यावेळी 4:30  नंतरही सुट्टी मिळत नाही.

त्याशिवाय प्रत्येक शनिवारी व्यक्तिमत्व विकासाच्या काही ना काही ऍक्टिव्हिटीज आयोजित केल्या जातात.यात प्रामुख्याने खालील बाबींचा समावेश असतो.

   1)Trekking - FC join केल्याच्या एका महिन्यानंतर OTs ना  विविध गटांमध्ये विभागून 7 दिवसांच्या हिमाचल trek वर पाठवलं जातं. तत्पूर्वी दर शनिवारी दहा-बारा कि.मी  अंतराचे treks केली जातात. नवीन मित्र-मैत्रिणी बनवण्यासाठी व  निसर्गाचे वैभव अनुभवण्यासाठी या treks  पेक्षा चांगली संधी दुसरी नसते.

  2) Athletics Meet - Trek नंतर Ots च्या वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या जातात. यामध्ये आपल्यातील क्रीडा कौशल्याचे प्रदर्शन करण्याची संधी मिळते.

  3) Fete - Athletics meet नंतर एका शनिवारी fete चे आयोजन केलं जातं. यात OTs ना ग्रुप मध्ये विभागून त्यांच्याकडून खाद्यपदार्थाचे stalls लावले जातात.यात पदार्थ बनवणे, stall ची सजावट करणे, जास्तीत जास्त विक्री करणे इत्यादी अनेक कामे OTs ना करावी लागतात.

   4) Village Visit -  fete नंतर  साधारणपणे 15 दिवसांनी OTs  ना वेगवेगळ्या गटात विभागून सात दिवसांसाठी UP, MP, Bihar, Himachal pradesh इत्यादी राज्यांतील विविध गावांमध्ये अभ्यासासाठी पाठवले जाते.

  5) India day - 26 Nov ला india day साजरा केला जातो.  india day हा  एक प्रकारचा सोहळाच असतो. यामध्ये OTs ना आपल्या राज्यातील संस्कृती सादर करावयाची असते.यात संगीत, वेशभूषा, खाद्यपदार्थ यांचा समावेश होतो. India day celebration हा Academy मधील सर्वात आनंदमय सोहळा असतो.

 6) cultural Night- साधारणपणे एका FC मध्ये दोन Cultural Night आयोजित केल्या जातात. यात OTs ना Dance, Drama , singing करता येते. याशिवाय व्यक्तिमत्व विकासाचे इतर अनेक उपक्रम असतात. मात्र हे सर्व तुमच्यासाठी सरप्राईज असतील.

 • Academy मधील सोयीसुविधा - 

Academy मध्ये OTs ना अनेक सोयीसुविधा उपलब्ध होतात. यात प्रामुख्याने Hostel ( जे अतिशय आधुनिक आणि उत्तम दर्जाचे असतात.) mess ( याचे महिन्याला 9- 10 हजार रुपये घेतले जातात.) Gym, Sports complex ( यात tennis, squash , table tennis , badminton , football, basket ball ई. याशिवाय अकॅडमीमध्ये बँक ,हॉस्पिटल देखील आहे. 

Academy च्या सुरक्षेसाठी ITBP चे जवान तैनात असतात.

थोडक्यात एका अधिकाऱ्याला ज्या सोयीसुविधा मिळायला हव्या ,त्या सर्व सोयीसुविधा पुरवण्याचा येथे प्रयत्न होत असतो.

          1) Academy तील पहिल्या दिवसाची सुरुवात शपथ विधीने होतो, तर FC चा शेवटचा दिवस ही  शपथविधीचा असतो.

         2) Academy मध्ये विविध राज्यातील व विविध सेवांमधील अधिकाऱ्यांमध्ये मैत्री व्हावी, म्हणून वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीस  घेतल्या जातात. Sitting Arrangement देखील अशा प्रकारचे असते की तुमच्या शेजारी तुमच्या राज्यातील व सेवेतील व्यक्ती नसते.

• Academy तील दिवसात 10-11 तासापर्यंतचे Schedule अतिशय व्यस्त असते. त्यामुळे Academy त OTs साठी काही अडथळा असेलच  तर तो वेळेचा असतो. काही वेळा तर रविवारची ही सुट्टी मिळत नाही. रविवारी एक तर ॲकॅडमी त एखादा event  असतो किंवा बाहेर river rafting, Para- gliding ,Rock climbing  अशा अनेक  Adventure Activities घेतल्या जातात.



No comments:

Post a Comment