चालू घडामोडीचे महत्व
एक घाव तीन तुकडे
चालू घडामोडीच महत्व काय आणि त्याचा अभ्यास कसा करावा हा प्रश्न निर्माण होतो.
• सर्वप्रथम आपण चालू घडामोडीच्या महत्वाबाबत बोलूया. 2016 च्या प्रीलियम मध्ये खूप जणांना धक्के बसले. कारण GS -1 मध्ये विचारलेल्या 100 प्रश्नांपैकी 80 पेक्षा जास्त प्रश्नांचा संबंध हा चालुघडामोडीशी होता.
याशिवाय 2015 च्या मुख्य परीक्षेतही चारही GS पेपर्समधील बहुतांश प्रश्न हे चालू घडामोडीवर विचारलेले होते. UPSC चा अभ्यासक्रम हा अफाट आहे. त्यामुळे कदाचित कोणत्या घटकावर प्रश्न विचारला जाणार, हे आपल्याला लक्षात येणार नाही. मात्र आपण जर मागील काही वर्षांच्या प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण केले तर असे दिसून येते की, विचारल्या गेलेल्या बहुतांश प्रश्नांचा स्रोत चालूघडामोडी हा होता. मुलाखतीमध्ये चालू घडामोडीवर प्रश्न विचारले जातात.
थोडक्यात Pre, Mains आणि interview या तिन्ही टप्प्यांवर चालू घडामोडींना सर्वाधिक महत्त्व आहे. अपवाद वगळता UPSC त विचारले जाणारे प्रश्न हे अवकाशातून पडत नसतात. त्यांचा कुठे ना कुठे चालू घडामोडींशी संबंधित असतो.
उदाहरणार्थ -मुख्य परीक्षेत (2015) GS-1 मध्ये भूकंपावर प्रश्न विचारला होता, कारण नेपाळमध्ये भूकंप झाला होता. तसेच याच पेपरमध्ये ,गांधी भारतात परत आले नसते तर आपल्याला मिळालेल्या स्वातंत्र्याचे स्वरूप कसे असले असते ?' हा प्रश्न विचारला होता कारण 2015 मध्ये गांधींना आफ्रिकेतून भारतात येऊन शंभर वर्षे पूर्ण झाली होती.
याशिवाय मोसम प्रकल्प ,डिजिटल इंडिया, स्मार्ट सिटीज, UNSC मधील भारताचे सदस्यत्व इत्यादी अनेक चालू घडामोडीमधील घटनांना अभ्यासक्रमाशी जोडून प्रश्न विचारले गेले होते.
थोडक्यात- ज्या विद्यार्थ्यांना खरोखरच UPSC क्रॅक करायचे आहे, त्यांना चालू घडामोडीशिवाय पर्याय नाही. त्यामुळे न्युज पेपर वाचण्यात 3 तास जात असतील तर वाईट वाटून घेऊ नये. कारण तो तुमच्या अभ्यासाचाच महत्त्वाचा भाग आहे.
• आता आपण चालू घडामोडी चा अभ्यास कसा करायचा हे पाहूया......
पहिल्यांदा येथे ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, UPSC मध्ये चालू घडामोडीवर विचारले जाणारे प्रश्न हे issue - based असतात. त्यामुळे news मधील राजकारणाचा भाग टाळावा.
उदाहरणार्थ- एखाद्या राज्यात निवडणुका होणार असतील तर तेथे Congress जिंकणार की BJP अशा स्वरूपाच्या बातम्या किंवा Editorials वाचू नये. मात्र भारतातील निवडणूक प्रक्रियेतील विलंब, NOTA , निवडणुका दरम्यान निर्माण होणाऱ्या समस्या, त्यावरील उपाय.ई चा अभ्यास मात्र अवश्य करावा. किंवा नुकतेच अरुणाचल प्रदेश ,उत्तराखंडामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. आता या ठिकाणी त्याची घटनात्मकता लक्षात घेणे आवश्यक असले, तरी चूक Congress ची की BJP ची, यावर जास्त वेळ वाया घालू नका. तर कलम 356 चा Relevance काय? ते कालबाह्य ठरत आहे का? त्याचा दुरुपयोग कसा होत आहे का? या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने काय निर्णय दिले आहेत? तुमच्या मते यावर उपाय काय? इ .घटकांचा अभ्यास करा. तसेच Editorials मधूनही याच प्रश्नांची उत्तरे शोधा .
यानंतर वर्तमानपत्रातून काही माहिती Publish होत असते, तिचा वापर prelims साठी होतो. म्हणून केवळ माहिती जमवण्यासाठी वेगळ्या नोट्स काढा.
उदाहरणार्थ world Bank च्या नुकत्याच प्रकाशित Ease of doing business या Re port मध्ये च'भारताचे स्थान 130 वे अशी बातमी असेल तर Pre साठी 'Ease of doing business report कोण प्रकाशित करतो? असा प्रश्न विचारला जाऊ शकतो तर 'भारत सरकारने वारंवार विविध मागणी प्रयत्न करूनही भारताचे या यादीतील स्थान कमी का आहे? हे स्थान उंचावण्यासाठी काय उपाय करता येतील? असा प्रश्न meins मध्ये विचारला जाऊ शकतो. त्यामुळे current affairs चा अभ्यास करताना हे दोन्ही approach ठेवा.
• अर्थात हे समजण्यासाठी Syllabus व मागील वर्षाच्या प्रश्नांचे Analysis करा.
• Paper वाचताना याचा आपल्याला GS 1,2,3,4 , Essay, Optional पैकी कशाला उपयोग होणार आहे ?हा प्रश्न मनात ठेवा आणि त्याच दृष्टीने त्याचे वाचन करा.
• दररोज साधारणपणे दोन ते तीन तास चालू घडामोडी चा अभ्यास करा.अर्थात, काही महिन्यांनी हा कालावधी एक-दीड तासापर्यंत कमी करता येतो.
• कोणतीही वादग्रस्त बातमी Gossips पूर्णत: राजकीय ,फिल्मी बातमी Skip करा .UPSC ला प्रशासक निवडायचे आहे राजकारणी नाही हे लक्षात घ्या.
• तुम्हाला तुमच्या नोट्स सहज पणे Revise करता येतील अशा पद्धतीने शॉट करा. म्हणजेच तुमच्या नोट्स या विषयनीहाय व त्या विषयातील टॉपिक्स निहाय काढा.वही ऐवजी सुट्ट्या पानांवरती नोट्स काढा जेणेकरून पुढे त्या सहज अपडेट करता येतील.
• वर्तमानपत्रातील आशय अपुरा वाटत असल्यास संबंधित टॉपिकचा अभ्यास इंटरनेटवरून करा.
• वर्तमानपत्रातील नोट्स काढण्याचे काम पुढे ढकलू नका .त्याचवेळी नोट्स काढा.
• वर्तमानपत्रातील कात्रणे कधीही काढू नका. त्याची रिविजन कधीच होत नाही.
• वर्तमानपत्री भाषेत नोट्स काढू नका. तुमच्या नोट्स या तुमच्याच भाषेत काढा. यासाठी आधी लेख वाचा, त्यातील महत्वाच्या भागास अधोरेखित करा. त्यानंतर त्या भागाचे वाचन करा व त्यातून तुम्हाला जे काही समजेल ते तुमच्या भाषेत लिहून काढा.
• नोट्स काढताना तीन-चार रंगाचे पेन वापरा.
• लेख वाचून फक्त त्याच्या नोट्स काढू नका, तर त्यावर विचार करा आणि त्यातून तुम्हाला सुचणारे तुमचे विचारही लिहा.
• नोट्समधील मुद्द्यांना शक्यतो 1-2-3 असे क्रमांक द्या.
• संपादकीय पानावर 'वाचकांच्या प्रतिक्रिया 'नावाचे सदर येते. ती सर्व पत्रे दररोज वाचा. यातून संबंधित विषयांवर तुमची पकड येऊन तुमचे स्वतःचे मत तयार होईल.
• एका डायरीमध्ये विषयनिहय चालू घडामोडी ज्वलंत विषयांची एक यादी बनवा .हि यादी तुम्हाला Pre नंतर mains साठी काय काय वाचायचे आहे .याची आठवण करून देईल.
• मॅक्झिन मधून वाचलेल्या बाबीं मधील जे मुद्दे वर्तमानपत्रातून मिळाले नसतील , त्यांची देखील त्या। त्या विषयांच्या टॉपिकच्या नोट्स मध्ये भर घाला.
• आणि सर्वात महत्वाचे म्हणजे या नोट्स ची वारंवार रिव्हिजन करा.
• नोट्स या शक्यतो शॉर्ट असावेत.
• पूर्ण वाक्य लिहिण्याची गरज नाही .मोजक्याच शब्दात नोट्स काढा.
• दुसऱ्या कोणाच्या नोट्स मिळवण्यासाठी धडपडू नका. स्वतःच्या नोट्स स्वतःच काढा.
• नोट्स बनवण्याची कोणतीही पद्धत सर्वश्रेष्ठ नाही. त्यामुळे तुमच्या आवडीप्रमाणे योग्य ती पद्धत नीवडा किंवा स्वतःच्या पद्धतीचा शोध घ्या.
• शॉर्ट नोट्स कशा काढाव्यात, यासाठी mrunal.org या वेबसाईट वरील घडामोडी च्या नोट्स पाहा.
No comments:
Post a Comment